गोंडपीपरी(सुरज माडुरवार):- तालुक्यातील मक्ता येथील तेरा महिला एकत्र येत रमाबाई महिला बचत गट स्थापन केला. सर्वानुमते सचिव म्हणून गटातील एका महिलेची निवड केली.मात्र सचिवांनी बचत गटाच्या महिलांच्या डोळ्यात धूळ फेकत सचिव पदाचा फायदा घेत लाखो रूपयाची अफरातफर केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.लाखो रूपयाची अफरातफर केल्या संदर्भात गोंडपीपरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सदर महिला बचत गटाच्या सचिव असून मक्ता अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असल्याने लाखो रुपयांची अफरातफर केल्याने तिला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या संदर्भात गोंडपिपरीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.व अफरातफर करणाऱ्या महिलेवर तातडीन कार्यवाही करण्याची मागणी केली.२००४ मध्ये मक्ता येथील १३ महिला एकत्र येत रमाबाई महिला बचत गटाच्या नावाने बँक ऑफ इंडिया भ.तळोधी येथे खाते उघडले. प्रति महिला ५० रुपये जमा करून दर महिन्याला ६५० रुपये बँक खात्यात जमा करण्याचे ठरविण्यात आले.काही दिवस व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र २००८ मध्ये गटाच्या नावाने बँकेतून एक लाख रूपयाचे कर्जाची उचल करून गटाच्या सभासदांना वाटप केले. कर्जाची सर्व रक्कम गटाच्या सचिव कोशल्या दुर्गे यांनी बँकेत भरले .परत त्याच दिवशी बँकेतून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले आणि सभासदात वाटप करण्यात आले. उचल केलेल्या कर्जाची रक्कम भरण्यासाठी परत २०१२ मध्ये एक लाख तीस हजार रूपये सचिवांकडे जमा करण्यात आले.त्याच वेळी महिन्याचे ५० रूपये भरणे बंद करण्यात आले.
२०१२ पासून गटाच्या महिला सचिवांना कर्जाची परतफेड बद्दल विचारणा केल्यास पूर्ण रक्कम भरल्याचे सांगितले. पासबुक मागितले असता तुम्ही काळजी करू नका माझ्याकडेच असल्याचे सांगत असल्याने माहे/एप्रिल २०२२ मध्ये बँकेत जाऊन सदर खाते क्रमांक वरील रक्कम तपासले असता सचिवाने ११ एप्रिल रोजी कर्जाच्या रकमे पैकी एक लाख तीस हजार रुपये व तिच्याकडील व्याजासहित जमा केलेल्या रकमेपैकी ७० हजार रुपये तिने बँकेत जमा केले होते व बाकीचे साठ हजार भरले नसल्याचे समजून आले .
सचिव यांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच गोंडपीपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. सचीवावर फसवणुकिचा गुन्हा ४०६ व ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.