• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे कर्तृत्‍व अलौकीक – आ. सुधीर मुनगंटीवार

भाजपा महानगर शाखेतर्फे पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Ashish Ghume by Ashish Ghume
May 31, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे कर्तृत्‍व अलौकीक – आ. सुधीर मुनगंटीवार
Spread the Information

रक्‍तदान शिबीराच्‍या माध्‍यमातुन अहिल्‍यादेवींना आदरांजली.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

चंद्रपूर :- राजमाता अहिल्‍यादेवी होळकर यांनी स्‍त्रीयांची सेना बनवून नारीशक्‍तीचा परिचय जगाला करून दिला. अतिशय योग्‍य शासक व संघटक न्‍यायप्रियता, पराक्रमी योध्‍दा आणि सर्वश्रुत धर्नुधर या सर्व गोष्‍टींमध्‍ये पारंगत असणा-या तसेच इतिहासाच्‍या कालपठावर स्‍त्री व्‍यक्‍तीमत्‍वाचा ठसा उमटविणा-या राजमाता अहिल्‍या देवी यांचे क‍र्तृत्‍व अलौकीक आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमीत्‍त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेच्‍या वतीने रक्‍तदान शिबीराचे आयोजन डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सभागृह येथे करण्‍यात आले होते. या शिबीरात पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला. यावेळी चंद्रपूर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, सुभाष कासनगोट्टूवार, सचिन कोतपल्‍लीवार, विठ्ठल डुकरे, सौ. वनिता डुकरे, छबूताई वैरागडे, पुरूषोत्‍तम सहारे, सुर्या खजांची, राकेश बोमनवार, रामकुमार अक्‍कापेल्‍लीवार, आशिष ताजने, वर्षा सोमलकर, नूतन मेश्राम, सतीश तायडे, आकाश मस्‍के, अमित निरंजने, पवन ढवळे, प्रविण उरकुडे, मधू श्रीवास्‍तव, प्रसाद आकेपेलीवार, मनीष पिंपरे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

दिनांक ३१ मे २०२२ रोजी भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे पुण्‍यश्‍लोक राजमाता अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमीत्‍त त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या काळात पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ अनेक गावांमधील धनगर वाडयांमध्‍ये प्रत्‍येकी ६५ लाख रूपये खर्चुन भवन बांधण्‍यात आले. त्‍यासाठी मी ४० कोटी रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला. धनगर समाजाच्‍या विकासासाठी एक हजार कोटी रूपयांचा विशेष निधी सुध्‍दा या काळात मंजूर करण्‍यात आला. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांनी त्‍यांच्‍या शासन काळात तिर्थक्षेत्र विकासावर विशेष भर दिला. हीच परंपरा पुढे नेण्‍याचा प्रयत्‍न मी माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात केला. श्री क्षेत्र भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, शिखर शिंगणापूर, कोराडी चे जगदंबा देवस्‍थान, श्री क्षेत्र पंढरपूर अशा विविध तिर्थक्षेत्रांच्‍या विकासासाठी मी निधी उपलब्‍ध करून दिला. पंढरपुर येथे तुळशी वृदांवन, संकीर्तन सभागृह निर्माण करण्‍यात आले. यासर्वांमागील प्रेरणा ही पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर याच होत्‍या. समाजाचे हित साधण्‍यासाठी, उपेक्षित, वंचितांच्‍या आयुष्‍यात प्रकाशाचा सुर्य निर्माण करण्‍यासाठी, त्‍यांची सेवा करण्‍यासाठी त्‍यांनी आपले आयुष्‍य खर्ची घातले. राजगादीपेक्षा जनतेच्‍या हृदयातील सिंहासन त्‍यांच्‍यासाठी महत्‍वाचे होते. अशा या थोर स्‍त्री शक्‍तीला मी आदरांजली अर्पण करतो असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

Previous Post

जिल्ह्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सप्टेंबर 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करावे

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1