कोरची/गडचिरोली
कोरची तालुक्यातील नागरिकांसाठी सध्या सर्वात मोठी डोकेदुखी बनलेली सेवा म्हणजे विद्युत सेवा आहे. तालुक्यातील अतिसंवेदनशील आदिवासी बहुल मुरकुटी व मयालघाट या गावांमध्ये मागील दहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाले आहे याकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष असल्याने येथील नागरिकांना भर उन्हाळ्यामधील नवव्या टप्प्यात सुद्धा उकाळ्यात दिवस व अंधारात रात्र काढावे लागत आहे. दहा दिवसापूर्वी अचानक वारा वादळ, पाऊस आल्याने या गावांना विद्युत पुरवठा देणारी विद्युत वाहिनीवर मोठे झाडं पडले त्यामुळे दोन पोल व सहा ते सात पोलचे तारे तुटून खाली पडली तेव्हा पासून मयालघाट व मुरकुटी या गावांची विद्युत सेवा पूर्णपणे खंडित झाले आहे.
तसे तर कोरची तालुक्यातील नागरिकांसाठी वारंवार विद्युत सेवा खंडित होणे हे नवीन नाही मात्र संबंधीत विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे व कंत्राटदार तबरेज शेख यांना याबाबद माहिती देऊन सुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कोरची तालुक्यातील वीज वितरण विभागाच्या विद्युत दुरुस्तीचे कंत्राट चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील तबरेज शेख यांना आहे त्यांच्याशी फोनवरून विचारणा केली असता म्हणाले की विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी सध्या काम करणारे मजूर मिळत नाही जसे मिळाले की काम करणार त्यामुळे आणखी किती दिवस येथील नागरिकांना अंधारात राहावे लागणार आहे .
कोरची येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंताचे प्रभार मिथिन मुरकुटे यांना दिले आहे. त्यांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे होते. विद्युत पुरवठा खंडित झाले की दोन दिवसात कंत्राटदारांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे होते, ठीक आहे मी कामाला सुरुवात करायला सांगतो आणि लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे फोनवरून विचारणा केली असता माहिती दिली आहे.
रवींद्र गाडगे,
अधीक्षक अभियंता महावितरण गडचिरोली.