वरोरा :- गेल्या चार ते पाच वर्षापासून कासवगतीपेक्षा कमी वेगाने चिमूर वरोरा मार्गाचे काम सुरू आहे . या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे कंत्राट एस आर के नामक कंपनीला मिळाले असून . येथील अभियंत्यांची कार्यपद्धती जगावेगळी असल्याचे अनुभव या मार्गाने प्रवास केल्यावर अनुभवायला मिळते . असाच प्रकार आज मार्गावरील परसोडा या गावाजवळ अनेक वाहन चालक अनुभवत आहे . थोड्या वेळा पूर्वी रिमझिम पडलेल्या पावसाने व अतीहुषार अभियंत्यांच्या कल्पना शक्तीमुळे रस्त्यावर टाकलेल्या मातीचे चिखल झाले असून दू बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे .
अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून दुचाकी बंद करून कशी बशी काढल्या जात आहे तर बऱ्याच वेलापासून एस टी महामंडळाची बस व या सह अनेक वाहने तिथे थांबून आहे.
या अभियंत्यांच्या जगावेगळ्या आयडिया मुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे . मात्र या सर्व प्रकाराला येथील स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांच्या मुखातून ब्र सुद्धा निघत नसल्याने व या सर्व प्रकारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने एस आर के कंपनीच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे वाहन चालक व प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे..
…………………………………………………………………………..आमच्या गावातील अनेक युवक रोजगारासाठी वरोरा येथे जातात रात्री बे रात्री आम्हाला प्रवास करावा लागतो .त्यासोबतच गावात एखादी रुग्ण असल्यास किंवा अचानक एखाद्याची प्रकृती खालावल्यास आम्हाला या मार्गा शिवाय पर्याय नाही . गेल्या ४ वर्षापासून सुरू असलेले काम अजूनही संपायचे नाव घेत नाही . कंपनीच्या अभियंत्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे झालेल्या बांधकामामुळे आमच्या गावाजवळ पावसाळ्यात रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होते . अनेकदा तक्रारी करूनही कोणीही दखल घेत नाही. आज रस्त्याच्या खोदकामात निघालेली माती रस्त्यावर टाकली आहे त्यावर काही वेळापूर्वी रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या त्यात संपूर्ण रस्ता चीखलमय झाला आहे . कंपनीच्या गलथानपणामुळे गावातील नागरिकांना तसेच प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो येथील लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांनी लक्ष देवून या त्रासापासून आम्हाला मुक्त करावे .
शुभम आमने
अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ परसोडा