कोरची/गडचिरोली
सन २०२२-२७ मधील खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर बिजप्रक्रिया केलेल्या धान बियाण्याची पेरणी करण्याच्याद्रुष्टीने बिक्रिया प्रात्यक्षिके मोहिम व्यापक राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पंधरा दिवसांचा कार्यक्रम २३ मे २०२२ पासून कोरची तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये लोकसहभागातुन बिजप्रक्रिया मोहिम राबविली जाणार आहे. तालुक्यातील शेतकरी दरवर्षी धानपिकासाठी उपलब्ध होणारे स्वतःकडील बाजारातील धान बियाणे वापरतात. बहुतांश शेतकरी स्वत:कडे राखून ठेवेलेले घरचे बियाणे वापरतात. अशा बियाण्यातून रोगांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी पिकाची उत्पादकता कमी होते. त्यामुळे शेतक-यांना किड रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या धानपिकाचे संरक्षण करण्यास किटकनाशके व बुरशिनाशके यांचेवर हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो. परिणामी उत्पादन अर्थात वाढ होवून उत्पन्न घटते. त्याकरिता खरीप हंगामातील धान बियाण्यास पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी प्रवृत्त करणे हे या मोहोमेचे उद्दिष्ट आहे.
बिजप्रक्रिया केलेले बियाणे पेरणी केल्यास किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होवून उत्पादनातील घट कमी होते. पिकाची उत्पादकता वाढून उत्पन्न अधिक येते. शेतक-यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे आणि बिजप्रक्रिया युक्त बियाणांचा वापर करावा असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
अशी करावी धान बिजप्रक्रिया –
धान पेरणीपूर्वी धानाला किड-रोगापासु मुक्त करण्यासाठी ३ किलो मिथ १० लीटर पाण्यात मिसळून ब्रावण तैयार करावे. या द्रावणात धान बि ओतावे व ढवळावे. द्रावणावर तरंगानारे हलके बि काढून जाळावे. तळाशी साचलेले जड बि बाहर काढून स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे. जेणेकरुण रोगत बियाणे बाजुला काढून निटनेटक्या बियाण्यांची पेरणी होवून उगावानिचे प्रमाण वाढते. धानाला बुरशिजन्य रोग लागू नए म्हणुन २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास थायरम/कॅपटन किंवा कार्बेडेझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशाकाची बिजप्रक्रिया करावी. तसेच धानपिकाते नात्र स्थिरीकरण व स्फुरद उपलाब्धातेसाठी अॅझॅटोबॅक्टर व स्फुरद विरघळनारे जिवाणु प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास चोळावे. अर्धा तास सावलीत सुरुवावे. बिजप्रक्रिया करतांना हातमोज्यांचा वापर करून स्वतःची काळजी घ्यावी.
ग्राही बाविचे होणार मार्गदर्शन :
बिजप्रक्रिया पंधरवडा कार्यक्रमामध्ये बियाण्यांची निवड, बिजप्रक्रिया तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, जीवाणु संवार्धकाचा वापर, बियाणे उगवणक्षमता चाचणी, हिरवळीचे खत, पीक विमा योजना, १०% ख़त बचत करण्याची पद्धत, गराळीचा पाला शेतात वापरने, यूरिया ब्रिकेटचा वापर, बांधावर खते, महाडीबिटीवर अर्ज करणे, यांचा समावेश आहे. त्याकरता तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कृषि सखी, कृषि संयोजिका, प्रगतिशील शेतकरी उपस्थित राहणार आहे आणि प्रत्येक गावातील शेतकरी सहभागी होणार आहेत.
बांधावर खत योजना : यंदा पावसाचे आगमन लवकर होनार असल्याचा अंदाज असल्याने प-हे लावन्याची व आवत्या लागवडीची लगबग सुरु होइल अशातच खतांची वेळेवर उपलब्धता होणेकरिता शेतक-यांनी लवकरच शेतकरी गटामार्फत एकत्रितपणे खताची उचल करावी. त्याकरिता कृषि विभाग निविष्ठा केंद्र आणि शेतकरी गट यांच्यात समन्वयक म्हणुन कार्य करेल. तसेच यंदा युरियाचे आवंटन कमी असल्यामुळे शेतक-यांनी गरजेपुरताच युरियाची उचल करावी असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.