गडचिरोली:- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहानिशा करून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा पोलीसांनी मजा घेऊन जाणारे वाहन गोमनी-सुंदरनगर रस्त्यावर पकडली.ही कारवाई मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांनी केली.
सदर वाहनात सुमारे 10,50,000/- रुपयांचा मुद्देमाल मिळाला असून सदर वाहनासहित मुद्देमाल पोलीसानीं ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी सुरवातीस पोलीसांनी एकास अटक केली होती. पुढे या गुन्ह्याचा तपास करीत पोलिसांनी सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व मालक असणारा मुख्य आरोपी मनोज मुजुमदार रा- कसनसुर ता. एटापल्ली यास दि-17/05/2022 रोजी अटक केली आहे.या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.मागील काही दिवसांपासून मुलचेरा तालुका मुख्यालयात मोठ्या प्रमाणात मजा तंबाखूची तस्करी होत आहे. मात्र,या कारवाईमुळे आता खुलेआम होणाऱ्या तस्करीवर आता आळा बसणार आहे.हे विशेष.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर,पोलीस उप निरीक्षक गणेश कड,ए एस आय रॅाय, पोलीस हवालदार बहीरवार,पोलीस शिपाई पोहनकर, झाडे,पवार,पेटकुले यांनी केले.