भद्रावती :– भारतीय पैरा ऑलम्पिक संघटनेतर्फे आयोजित अखिल भारतीय पैरा ऑलंपिक तांत्रिक अधिकारी व पंच परीक्षा दिनांक 8 व 9 जानेवारी, 2022 रोजी बेंगलुरु येथे आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेला देशभरातील शंभरहून अधिक पात्र परीक्षार्थीनी सहभाग नोंदवला होता. सदर परीक्षेकरिता चंद्रपूर जिल्ह्यातर्फे भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा विभागप्रमुख प्रा. संगिता बांबोडे, शासकीय आदिवासी आश्रम शाळा पाटण येथील क्रीडामार्गदर्शिका कु. वर्षा कोयचाडे तसेच चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सदस्य कु. पूर्वा खेरकर यांनी सदर परीक्षेमध्ये सहभाग घेतला असून तिघेही राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी व पंच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
तिघींच्या प्राविण्याबद्दल क्रीडा जगतात तिघींचेही सर्वत्र कौतुक होत असून यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ नामदेव उमाटे, पत्रकार डॉ. यशवंत घुमे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध हौशी क्रीडा संघटक डॉ.दिलीप जयस्वाल, डॉ. राकेश तिवारी, डॉ.बी.प्रेमचंद, रसिकलाल वारकरी, डॉ अनिता लोखंडे, गजानन जिवतोडे, सुरेश अडपेवार, राजेश मत्ते, संतोष निंबाळकर, चंद्रशेखर कुंभारे, दुर्गराज रामटेके, डॉ.संघपाल नारनवरे, डॉ.अनीस खान तानाजी बायस्कर, किशोर चिंचोलकर, हरिश्चंद्र विरुटकर, उमेश कडू, शिवाजी नागरे, बाळू कातकर, मयूर खेरकर, विकी पेटकर तसेच समस्त क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले असून पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.













