असामान्य व्यक्तीमत्वाचे धनी नारायणराव वरखडे
श्री. नारायणराव पर्वतराव वरखडे वरो-यातील एक असामान्य व्यक्तीमत्व . सरदार पटेल वार्ड वरोरा येथील रहीवासी असलेले श्री नारायणराव हे १९९२ पर्यंत टेलिफोन एक्सचेंज वरोरा येथे कार्यरत होते . सामाजिक कार्यात ते नेहमीच हिरीरिने सहभागी होत असत. गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आणि दातृत्वशीलता अशी त्यांची ओळख आहे . नागपूर चंद्रपूर हायवेवरील अगदी मोक्याची जमीन त्यांनी संत श्री. जगदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थानास दान देऊन आपल्या दातृत्वाचा परीचय दिला . नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असले तरी प्रसिद्धी पासून ते कोसो दूर राहिले . निर्गवी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.आपल्या वाट्याला आलेल्या सामाजिक कार्यास त्यांनी तनमनधनाने सदैव पुढे नेले . अशा या अद्वितीय सामाजिक व धार्मिक व्यक्तिमत्वास आज वरोरावासी मुकलेले आहे .
आज दिनांक २३ एप्रिल २०२२ ला नागपूर येथील किंग्जवे हाॕस्पीटल येथे हार्ट ब्लाॕकेजमुळे त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दुःखद निधन झाले . त्यांच्या मागे मोठा परिवार आहे . दोन्ही मुले सुनील व अनील हे वरो-यातील प्रतिष्ठीत व्यवसायी असून वडीलांच्याच पावलावर पाऊल टाकून आपले सामाजिक दायीत्व पार पाडत आहे . या अत्यंत कठीण प्रसंगातून समस्त वरखडे कुटुंबीयांना सावरण्याचे बळ देवो अशी श्री. जगन्नाथचरणी प्रार्थना.