भद्रावती : गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना यूनिवर्सिटी टीचर्स असोसिएशन चंद्रपूर द्वारा दिनांक २४ एप्रिल २०२२ रोज रविवारला सकाळी १०.३० वाजता समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बुद्धिजीवींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षे कोवीडच्या महामारीने जगात थैमान घातले होते. या कालावधीत अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. काही प्राध्यापकांनी लक्षणीय कार्य केले. प्राध्यापकांशिवायही समाजातील वकील, डॉक्टर, इंजिनिअर यांनीही समाजोपयोगी कार्य केले. या सर्वांच्या कार्याची दखल घेत संघटनेच्या वतीने उपरोक्त स्थळी सर्व क्षेत्रांत काम केलेल्या मान्यवरांसाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सनदी अधिकारी झेड. खोब्रागडे, उद्घाटक गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर राहणार आहेत. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील प्राचार्य पी. एम. काटकर, सीडीसीसी बँकेचे संचालक ललित मोटघरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर असोसिएशन चंद्रपुर चे अध्यक्ष अॅड. कपिल भगत, प्रवीण डोंगरे (चंद्रपूर) इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तरी सीडीसिसी बॅक, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होणाऱ्या या सत्कार समारंभास गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापकांनी व जिल्ह्यातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ.सुधाकर पेटकर, सचिव डॉ. प्रमोद शंभरकर उपाध्यक्ष डॉ.इसादास भडके, कोषाध्यक्ष डॉ.प्रकाश तितरे यांनी केले.