कोरची:- तालुका मुख्यालयापासून नऊ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या मसेली येथे बँक ऑफ इंडिया शाखा कोरची च्या वतीने मोफत ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या मोफत ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन कोरची येथील बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक सतीश कावरे, सहउद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये तसेच प्रतिष्ठित व्यापारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी,गडचिरोली काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, अभियंता प्रफुल कुरसंगे,वैघकीय अधिकारी डॉ.शुभम वायाळ,वैघकीय अधिकारी ज्ञानदीप नखाते,वैघकीय अधिकारी डॉ. स्वप्नील राऊत,कोरची तहसील लिपिक प्रांजली मेश्राम,mts अनिकेत भांडारकर,निलेश सूर्यवंशी,रमेश मांडेलवार,राहुल अंबादे, मसेली माजी सरपंच हिरालालजी सयाम,प्रतिष्ठित व्यापारी धनसिंग चव्हाण,पंढरीजी चौधरी,सदाराम कोरेटी,गहाने,रंजीत सरजारे,मनीषा बडोले,संगीता अंबादे,मुन्शीलाल अंबादे,झगरू मडावी,सिद्धार्थ राऊत,अरविंद अंबादे,राजू भैसा,नितीन चौधरी,विक्रांत कराडे उपस्थित होते. अतिदुर्गम मसेली परिसरातील कैमुल, सावली,नवेझरी,बोंडे,डाबरी,आगरी,बोदालदंड, अस्वलहुडकी,बेलारगोंदी,राजाटोला,बीजेपार, बोडेना गावातील नागरिकांना मोफत ग्राहकसेवा केंद्र सुरू झाल्याने सोयीचे झाले आहे. आता परिसरातील ग्राहकांना 20 हजारापर्यंत रक्कम काढता येणार आहे. तसेच नवीन खाते उघडणे, पैसे जमा करणे,पैसे ट्रान्सफर (NFT) करणे, प्रधानमंत्री विमा योजना काढणे व विद्युत बिल भरण्यासाठी कोरची जावे लागनार नाही ग्राहकांना आता विद्युत बिल सुद्धा इथे भरले जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या खात्याशी आधार लिंक किंवा के वाय सी(KYC) करण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा कोरचीलाच करायचे आहे.