वरोरा : वर्धा येथे ५ ते ६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित विभागीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत वरोरा येथील फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सानिया राजेश आवारी, किरण मनोहर गोचे आणि रितीक श्रीकृष्ण धवणे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. या यशाच्या जोरावर तिन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तिन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे वरोरा शहराच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशाबद्दल शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थ्यांना जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख शिहान विनय बोढे, मुख्य प्रशिक्षक सेन्सई रवी चरुरकर तसेच सेम्पाई घनश्याम खोंडे, फकिरा निखाडे, अश्विनी नरड आणि शोन दसुडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर (माजी सैनिक व नगरसेवक), दिगंबर खापणे (माजी सैनिक), रवी तुराणकर (माजी सैनिक), हेमराज बेहरे (मराठा रेजिमेंटचे माजी सैनिक), बजरंग वानखडे (तायक्वांदो सचिव व माजी सैनिक) आणि गुरू राजू नकवे यांनी अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.













