• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

आमरण उपोषण मागे; खेळाडूंच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Suraj Ghume by Suraj Ghume
November 11, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!
Spread the Information

वरोरा : तालुका क्रीडा संकुलाचे मैदान मेळाव्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावरून वरोऱ्यात सुरू झालेला संघर्ष अखेर आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर थांबला असला, तरी मैदानाच्या वापराचा प्रश्न अद्याप कायम आहे. आंदोलनकर्त्यांच्या चार मागण्यांपैकी तीन मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असून, चौथ्या मागणीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. मात्र, सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यंदा नियोजित मेळावा याच मैदानावर होणार असल्याने प्रशिक्षण आणि सराव करणाऱ्या खेळाडूंचे झालेले नुकसान भरून कसे निघणार? प्रशासनाने भविष्यातील वापराबाबत ठराव केला असला, तरी यंदाच्या मेळाव्याबाबत कोणताही बदल झालेला नाही.

RelatedPosts

हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त माढेळी येथे मसाला दुधाचे वाटप

फिस्कुटी शिवारात वाघाचा हल्ला; ६६ वर्षीय शेतकरी जखमी

दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात पत्रकार संघाने फुलविला दिवाळीचा आनंद

कल्पतरू सार्वजनिक संस्थेच्या वतीने १३ नोव्हेंबरपासून आयोजित मेळाव्यासाठी तालुका क्रीडा संकुलाचे मैदान देण्यास प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर या निर्णयाला विरोध सुरू झाला. खेळाडूंच्या सरावासाठी आणि क्रीडा स्पर्धांसाठी असलेल्या मैदानाचा व्यावसायिक स्वरूपाच्या मेळाव्यासाठी वापर करण्यास शिवसेना उबाठा नेते मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात विरोध करण्यात आला. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला. त्यानंतर आनंद गेडाम आणि निखिल मांडवकर यांनी आमरण उपोषण सुरू केले.

आंदोलनादरम्यान तालुका क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. यापुढे क्रीडा संकुलाचे मैदान क्रीडाविषयक आयोजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देऊ नये, तसेच मैदानाच्या वापराबाबत शासनाचे प्रचलित नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे भविष्यात मैदानाच्या वापराबाबत भूमिका स्पष्ट झाली असली, तरी यंदाच्या मेळाव्याला दिलेली परवानगी कायम असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मूळ आक्षेपाचे पूर्ण निराकरण झालेले नाही.

मग खेळाडूंच्या मतांचा विचार आधी का झाला नाही?

क्रीडा संकुलाचे मैदान देण्याचा निर्णय घेताना तेथे नियमित सराव करणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी यांची मते जाणून घेण्यात आली होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मैदानावर प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंच्या सरावावर आणि तयारीवर मेळाव्यामुळे परिणाम होणार असल्याची शक्यता असताना प्रशासनाने त्यांच्या अडचणींचा विचार केला होता का? क्रीडा विभागाची भूमिका व्यावसायिक आयोजनाला प्राधान्य देणारी होती की खेळाडूंच्या हिताचे संरक्षण करणारी, असा सवालही उपस्थित होत आहे.

प्रशासनाला आता जाग आली का?

मैदानाच्या भविष्यातील वापराबाबत ठराव करण्याची वेळ आंदोलनानंतरच का आली? यापूर्वीच अशा प्रकारच्या आयोजनांबाबत स्पष्ट धोरण निश्चित करता आले नसते का? तीन मागण्या मान्य करून प्रशासनाने भविष्यातील मैदानाच्या वापराबाबत भूमिका स्पष्ट केली असली, तरी १३ नोव्हेंबरपासून होणाऱ्या मेळाव्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यंदा मैदानावर प्रशिक्षण आणि सराव करणाऱ्या खेळाडूंचे झालेले नुकसान कोणाच्या जबाबदारीवर राहणार, याचे उत्तर प्रशासनाने देणे अपेक्षित आहे.

दरम्यान, उपोषणस्थळी नायब तहसीलदार गिरीश बोरुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहीफोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे यांच्या उपस्थितीत आनंद गेडाम आणि निखिल मांडवकर यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. त्यानंतर दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. चौथ्या मागणीसाठी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मनीष जेठाणी यांनी स्पष्ट केले.

उपोषण मागे घेण्यात आले असले, तरी क्रीडा संकुलाच्या मैदानाचा प्रश्न संपलेला नाही. भविष्यात मैदान व्यावसायिक आयोजनांसाठी उपलब्ध होणार नाही, असा ठराव झाला; मात्र यंदाच्या मेळाव्याला परवानगी कायम आहे. त्यामुळे खेळाडूंच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे वरोरा शहराचे लक्ष लागले आहे.

Tags: #shivsenaCHANDRAPURmla karan deotalesportsWarora
Previous Post

हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त माढेळी येथे मसाला दुधाचे वाटप

Suraj Ghume

Suraj Ghume

सुरज घुमे दैनिक सह्यद्रीच्या राखणदार या वृत्रपत्राचे कार्यकारी संपादक आहे .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

November 11, 2026
हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त माढेळी येथे मसाला दुधाचे वाटप

हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त माढेळी येथे मसाला दुधाचे वाटप

November 11, 2026
फिस्कुटी शिवारात वाघाचा हल्ला; ६६ वर्षीय शेतकरी जखमी

फिस्कुटी शिवारात वाघाचा हल्ला; ६६ वर्षीय शेतकरी जखमी

November 11, 2026
वरोराच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड

वरोराच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड

November 11, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1