भद्रावती : आजच्या वर्तमान काळात संगणक हा कार्यालयाचा केंद्रबिंदू झालेला असून सगळ्यांना संगणक हाताळता येणे आवश्यक आहे असे विचार संदीप देशमुख (चंद्रपूर) यांनी व्यक्त केले.
ते विवेकानंद महाविद्यालयातील आईक्यूएसी विभागाच्या वतीने आयोजित संगणक हाताळणी कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. मंचावर महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक सतीश मशारकर, वाणिज्य विभागप्रमुख विजय टोंगे, कनिष्ठ लिपिक दिलीप भोयर, दीपक तेलंग प्रमुख्याने उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे संचालन गणेश गौरकर, प्रास्ताविक दिलीप भोयर, आभारप्रदर्शन दीपक तेलंग यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.