गडचिरोली:-मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर गावलागतच्या जंगल परिसरात गावठी दारूच्या हातभट्टीवर मुलचेरा पोलिसांनी धाड टाकून करून एकास अटक केली आहे.
19 एप्रिल रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकले असता, सुंदरनगर गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्याजवळ झुडपात गुळ-मोहा सडवा करून त्यापासून दारू गाळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले.लगेच पोलिसांनी त्या ठिकाणाहून बिर्रेन सुवरण रॉय (42) राहणार सुंदरनगर यास ताब्यात घेतले व सुमारे सहा ड्रम गुळ-मोहाचा सडवा नष्ट करून 48 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी मुलचेराचे पदभार स्वीकारल्यानंतर मल्लेरा जंगल परिसरात धाड टाकून काही जनावरांना जीवनदान देत एका गो-तस्कराला अटक केली त्यानंतर लगेच गावठी हातभट्टी चालविणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केल्याने परिसरात देशी व विदेशी दारू विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.