भामरागड- येथील राजे विश्वेश्वर राव कला वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष डाखरे यांच्या मार्गदर्शनात नुकतीच राज्यशास्त्र विद्यार्थी अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, तसेच उच्च शिक्षण व रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा या अभ्यास मंडळाचा प्रमुख उद्देश आहे.अभ्यास मंडळाच्या माध्यमातून नेतृत्व विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी, मतदार जनजागृती, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे, तज्ज्ञ मार्गदर्शन, उद्योजकता विकास कार्यक्रम, आर्थिक साक्षरता अभियान, औद्योगिक भेटी, संशोधन व प्रकल्प सादरीकरण यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.पुढीलप्रमाणे अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष सोनू मडावी, उपाध्यक्ष इरपा पुंगाटी, सचिव देविका गवारे, सदस्य करण वेळंजे, जिजा परसा, ललिता तेलामी, श्रीनिवास सडमेक, सुमन हेडो, वैशाली मिच्छा यांची निवड करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमाला डॉ. कैलास निखाडे, डॉ. प्रमोद घोनमोडे उपस्थित होते. संचालन सोनू मडावी तर आभार वैशाली मिच्छा हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बंडू बोंडे यांनी परिश्रम घेतले.













