• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

दुर्गम बालकांच्या संगोपनाला नवी दिशा! जिल्ह्यात उभारणार ४५ समुदायाधारित पाळणाघरे;एटापल्लीतील पैमा येथे पहिल्या पाळणाघराचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 4, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
दुर्गम बालकांच्या संगोपनाला नवी दिशा! जिल्ह्यात उभारणार ४५ समुदायाधारित पाळणाघरे;एटापल्लीतील पैमा येथे पहिल्या पाळणाघराचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण
Spread the Information

गडचिरोली; दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांच्या पोषण, आरोग्य आणि सुरक्षित संगोपनासाठी गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ४५ समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

या पाळणाघरांमध्ये बालकांना सुरक्षित वातावरण, पोषक व वैविध्यपूर्ण आहार, आरोग्य-स्वच्छतेची काळजी आणि वयानुरूप प्रारंभिक विकासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील मातांना रोजगार व उपजीविकेच्या कामांसाठी आवश्यक वेळ मिळणार असून, बालकांच्या संगोपनाची जबाबदारीही अधिक सुरक्षितपणे पार पाडता येणार आहे.
जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांच्या सामंजस्य करारांतर्गत ‘बाल पोषण व विकास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने ‘मोबाईल क्रेचेस फॉर वर्किंग मदर्स चिल्ड्रेन’ संस्थेमार्फत एटापल्ली तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.

पहिल्या एक हजार दिवसांवर विशेष भर

बालकाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे टाटा ट्रस्ट्सच्या न्यूट्रिशन विभागाच्या प्रमुख जयीता चौधरी यांनी सांगितले. पाळणाघरातील बालकांना अंगणवाडी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी जोडून गरजेनुसार वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी, “भौगोलिक दुर्गमतेमुळे कोणतेही बालक आरोग्यसेवा, पुरेसे पोषण आणि सुरक्षित संगोपनापासून वंचित राहू नये,” अशी भूमिका मांडली.

डीएमएफच्या कामांचीही पाहणी

पाळणाघराच्या उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी क्षेत्रीय दौऱ्यात बुर्गी येथील जिल्हा परिषद शाळेतील डीएमएफ निधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. कामाची प्रगती आणि सद्यस्थितीची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.यानंतर तोडसा शासकीय आश्रमशाळेतील नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. शिक्षण आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी विद्यार्थिनींकडून माहिती जाणून घेतली.

तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देत

जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
नागुलवाही रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी दौऱ्याच्या अखेरीस नागुलवाही येथील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता आणि प्रगती तपासली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत सविस्तर माहिती घेत आवश्यक बाबींवर लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे सुरू झालेले केंद्र हे या उपक्रमातील पहिले समुदायाधारित पाळणाघर आहे. येत्या काही महिन्यांत नियोजित ४५ पाळणाघरे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, दुर्गम भागातील बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

Previous Post

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंगणवाडीचे काम तातडीने पूर्ण करा;जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

Next Post

निधनानंतर मिळणाऱ्या मदतीपेक्षा उपचाराच्या वेळी मिळणाऱ्या पैशाचे मोल अधिक: पी. जी. नरवणे

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1