अहेरी : शिक्षण परिषद म्हणजे केवळ काही तास एकत्र बसणे नव्हे, तर आपल्या शैक्षणिक कामाकडे चिकित्सक आणि सकारात्मक दृष्टीने पाहण्याची संधी आहे, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख आशिष येल्लेवार यांनी केले. वेलगुर केंद्राची दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद २५ ऑगस्ट रोजी जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मदिगुडम येथे उत्साहात पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळशीराम नैनलवार, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जि. प. उच्च प्राथमिक शाळा वेलगुर होते. उद्घाटन सौ. गुंडावार, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती मदिगुडम यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शीद शेख, प्रभाकर आचेवार आणि कु. सिम्पल मुधोडकर उपस्थित होते.
परिषदेत आशिष येल्लेवार यांनी मागील परिषदेचा आढावा व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कृती आराखडा मांडला. रमेश गुंडावार यांनी निपुण महाराष्ट्र, प्रभाकर आचेवार यांनी अध्ययन निष्पत्ती व आदर्श पाठ, तर अमित बंडावार यांनी बेस्ट प्रॅक्टिस यावर मार्गदर्शन केले.याशिवाय स्त्रीता राऊत यांनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा, सिम्पल मुधोडकर यांनी गणित-विज्ञान अध्ययन समृद्धी, रमेश चांदेकर यांनी DIKSHA, ECCE व UDISE Plus, तर रमेश शेटी यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाबाबत माहिती दिली. दीपा रामटेक, ताराचंद भुरसे, लक्ष्मण रत्नम, चंदन रापर्तीवार आणि जगदीश बोमावार यांनी नवभारत साक्षरता, आनापान साधना, विनोबा ॲप आणि अन्न सुरक्षा कायदा याबाबत मार्गदर्शन केले.
परिषदेत प्रत्यक्ष वर्गातील उपयोजन, समस्या निराकरण, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि कृती आराखड्यावर भर देण्यात आला. त्यामुळे शिक्षकांसाठी ही परिषद उपयुक्त व परिणामकारक ठरली.विचारमंथनातून कृती आणि कृतीतून गुणवत्तापूर्ण शिक्षणअसा संदेश देत वेलगुर केंद्राची दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.













