• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लोकार्पण! ​

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 25, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लोकार्पण!  ​
Spread the Information

गडचिरोली:जिल्हा नियोजन समिती गडचिरोलीच्या ‘नाविन्यपूर्ण योजना २०२४-२५’ अंतर्गत शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चा लोकार्पण सोहळा मंगळवारी (२५ ऑगस्ट) रोजी थाटात संपन्न झाला. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापक सौ. दिव्यभारती (भा.व.से.),विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, भामरगडचे उपसंवरक्षक शैलेश मीना,उप विभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसीलदार बालाजी सोमवंशी,यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

या प्रकल्पासाठी एकूण ३ कोटींचा अंदाजपत्रकीय आराखडा तयार करण्यात आला असून, १ कोटी ५९ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेतून हे आधुनिक केंद्र उभारले गेले आहे. या अंतर्गत ई-निविदा प्रक्रियेद्वारे आधुनिक प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळ उभारण्यात आले असून GeM पोर्टलवरून अत्याधुनिक मशिनरी खरेदी करून बसवण्यात आली आहे.

​आलापल्ली व परिसरातील स्थानिक तरुणांना अत्याधुनिक काष्ठ प्रक्रियेचे मोफत प्रात्यक्षिक व कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे महिला आणि तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी किंवा केंद्रात प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होईल.विशेष म्हणजे स्थानिक स्तरावर उपलब्ध लाकडाचा वापर करून ‘कस्टमाइज्ड फर्निचर डिझाईन’ तयार केले जाईल. त्यामुळे वाहतूक खर्च वाचून कमी किंमतीत मजबूत व पर्यावरणपूरक फर्निचर मिळेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आणि शाळांसाठी लागणारे सर्व फर्निचर आता याच केंद्रातून पुरवले जाईल. यामुळे स्थानिक सुतार, कारागीर आणि लघुउद्योजकांना मोठी कामे मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

विशेष म्हणजे या प्रशिक्षण केंद्रात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळाला आहे. सागवान लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. त्यांना रोजगार मिळाल्यामुळे ते आत्मनिर्भर झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला.

*​’मेक इन डिस्ट्रिक्ट’ संकल्पना प्रत्यक्ष उतरणार*

गडचिरोलीतील लाकूड आता बाहेर न जाता, इथेच त्यावर प्रक्रिया करून अंतिम वस्तू तयार केली जाईल. यामुळे जिल्ह्याचा पैसा जिल्ह्यातच राहील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.​या उपक्रमामुळे आलापल्ली परिसरातील वनसंपदेचा स्थानिक विकासासाठी योग्य वापर होणार असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे स्थानिक नागरिकांनी व कामगारांनी जोरदार स्वागत केले आहे.

बॉक्स ——————–
जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळ उभारण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील मौल्यवान सागवान लाकडापासून विविध वस्तू, तसेच फर्निचर तयार करण्यात येणार आहे. स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या रोजगार देण्याचा प्रयत्न आहे.
-अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी गडचिरोली

Previous Post

गडचिरोलीत पुराचा तडाखा; मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच पुराच्या पाण्यात अडकली

Next Post

केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1