• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; जड वाहनामुळे पुन्हा आलापल्ली-सिरोंचा मार्ग ठप्प

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 15, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; जड वाहनामुळे पुन्हा आलापल्ली-सिरोंचा मार्ग ठप्प
Spread the Information

अहेरी : जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातलेली असतानाही आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुसुकपल्लीजवळील नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलावर १५ ऑगस्ट रोजी एक जड वाहन अडकल्याने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गेल्या चार-पाच वर्षांपासून या मार्गाचे बांधकाम सुरू आहे. सुमारे १०० किलोमीटरच्या या महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांचे काम सुरू असून, त्यासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते वळण मार्ग पावसाळ्यात वारंवार वाहून जात आहेत. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली होती.
मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावरच आणि रस्त्यावर जड वाहनांची बेफाम वाहतूक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाकडून या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने तेलंगणा आणि छत्तीसगडकडे जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ सुरूच आहे. हा मार्ग इतर राज्यांकडे जाण्यासाठी तुलनेने शॉर्टकट असल्याने मोठ्या प्रमाणावर जड वाहने या रस्त्याचा वापर करतात.

याचाच फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला. पुसुकपल्लीजवळ पुलावर जड वाहन अडकल्यानंतर वाहन काढण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र वाहन निघू शकले नाही. परिणामी मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. आधीच खड्डे, अपूर्ण बांधकाम, तात्पुरते वळण मार्ग आणि पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू असताना आता बंदी असलेल्या जड वाहनांमुळे पुन्हा वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातल्यानंतरही जड वाहने रस्त्यावर धावत असतील, तर बंदी आदेशाची अंमलबजावणी कोण करणार? संबंधित विभाग नेमका कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या दुर्लक्षामुळे कारवाई करत नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकूणच, ‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर, जड वाहनांना मोकळे रान’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार वाहतूक ठप्प होऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Previous Post

जन्नीच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाला जाग; भामरागडसाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाचे आदेश मातेच्या मृत्यूने यंत्रणा हादरली; पावसाळ्यातील विशेष आरोग्य सेवा पुन्हा सुरू, मात्र जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होते का? असा संतप्त सवाल

Next Post

रोजगार, आरोग्य अन् पायाभूत सुविधांना बळ; समृद्ध गडचिरोली घडविण्याचा संकल्प

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
रोजगार, आरोग्य अन् पायाभूत सुविधांना बळ; समृद्ध गडचिरोली घडविण्याचा संकल्प

रोजगार, आरोग्य अन् पायाभूत सुविधांना बळ; समृद्ध गडचिरोली घडविण्याचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1