• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जन्नीच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाला जाग; भामरागडसाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाचे आदेश मातेच्या मृत्यूने यंत्रणा हादरली; पावसाळ्यातील विशेष आरोग्य सेवा पुन्हा सुरू, मात्र जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होते का? असा संतप्त सवाल

govind chakravarti by govind chakravarti
August 14, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
जन्नीच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाला जाग; भामरागडसाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाचे आदेश मातेच्या मृत्यूने यंत्रणा हादरली; पावसाळ्यातील विशेष आरोग्य सेवा पुन्हा सुरू, मात्र जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होते का? असा संतप्त सवाल

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड : गोविंद चक्रवर्ती

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

भामरागड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील चिचोडा येथील जन्नी पुसू नैताम आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली असून, भामरागड ग्रामीण रुग्णालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे आरोग्य सेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, दुसरीकडे जन्नीच्या मृत्यूनंतरच ही यंत्रणा का जागी झाली, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

भामरागड तालुक्यातील नागरिकांना मुख्य आरोग्य सेवा देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. पावसाळ्यात तालुक्यात निर्माण होणारी पूरस्थिती, तुटणारे रस्ते, गावांचा मुख्यालयाशी संपर्क खंडित होणे आणि दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे येथील नागरिकांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो. विशेषतः गरोदर माता, नवजात बालके आणि लहान मुलांसाठी पावसाळ्याच्या काळात तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे अत्यावश्यक मानले जाते.

याच पार्श्वभूमीवर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी भामरागड ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ तसेच क्ष-किरण तज्ज्ञ अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त केले जात होते. पूरस्थितीत वाहतूक आणि संपर्क व्यवस्था कोलमडल्यास तालुक्याच्या ठिकाणीच आवश्यक उपचार उपलब्ध व्हावेत, हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.

मात्र यंदाच्या पावसाळ्यात या विशेष आरोग्य सेवेत कपात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये सुरुवातीपासूनच नाराजी होती. त्यातच यावर्षी भामरागड तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला. भामरागड शहराचा सुमारे ८० टक्के भाग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. काही काळ संपूर्ण तालुक्याचाच बाहेरील जगाशी संपर्क जवळपास खंडित झाला होता.

अशा बिकट परिस्थितीत आरोग्य सेवेची आवश्यकता किती गंभीर आहे, याची प्रचिती यापूर्वीही आली आहे. लाहेरी येथील श्यामसुंदर नरंगो नरोटे यांना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा मुख्यालयात हलविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. मात्र सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. दुर्गम आणि अतिवृष्टीग्रस्त भागात वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध होणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले.

दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील जन्नी पुसू नैताम या महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, आरोग्य व्यवस्थेच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

जन्नीच्या मृत्यूची घटना ११ ऑगस्ट रोजी घडल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १२ ऑगस्ट रोजी उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांनी भामरागडसाठी तात्पुरत्या स्वरूपात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे आरोग्य विभागाने आता भामरागडमधील विशेष आरोग्य सेवेचा प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.

मात्र या निर्णयामुळे नागरिकांचा संताप कमी होण्याऐवजी उलट अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरवर्षी भामरागडमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते, गावांचा संपर्क तुटतो, गरोदर माता आणि बालकांना आरोग्यसेवेची मोठी गरज असते, हे प्रशासनाला माहीत असताना यंदा विशेष वैद्यकीय पथकाची व्यवस्था आधीच का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

आरोग्य यंत्रणा सजग करण्यासाठी एखाद्या महिलेचा आणि तिच्या अजन्म्या बाळाचा जीव जाणे आवश्यक आहे का, असा संतप्त प्रश्न आता भामरागड तालुक्यात चर्चिला जात आहे. प्रशासनाने केवळ एखादी दुर्घटना घडल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागातील आरोग्य व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी नियोजन करण्याची गरज आहे.

भामरागडसारख्या दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सुविधा हा केवळ प्रशासनाचा विषय नसून नागरिकांच्या जगण्याशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. पावसाळ्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टर, औषधसाठा, अत्यावश्यक उपकरणे, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा कायम सज्ज ठेवण्याची गरज आहे. विशेषतः गरोदर माता आणि बालकांसाठी स्वतंत्र आपत्कालीन आरोग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

जन्नीच्या मृत्यूनंतर तज्ज्ञ वैद्यकीय पथक नियुक्त करण्याचे आदेश निघाले, ही बाब स्वागतार्ह असली तरी ही व्यवस्था केवळ तात्पुरती न राहता भामरागडच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करून कायमस्वरूपी सक्षम करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

जन्नीच्या मृत्यूची चौकशी होऊन नेमकी परिस्थिती काय होती, तिला वेळेत कोणती वैद्यकीय मदत मिळाली, उपचारासाठी कोणत्या अडचणी निर्माण झाल्या आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याचीही प्रशासनाने स्पष्ट माहिती जनतेसमोर ठेवणे आवश्यक आहे.

कारण प्रश्न केवळ एका जन्नीचा नाही; प्रश्न भामरागडच्या प्रत्येक गरोदर मातेचा, प्रत्येक नवजात बालकाचा आणि दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा आहे. प्रशासनाने आता घटना घडल्यानंतरची धावपळ न करता घटना घडू नये यासाठीची पूर्वतयारी करण्याची वेळ आली आहे.

Previous Post

आश्रमशाळांमध्ये ‘जितक्या कॉट-गाद्या, तितकेच प्रवेश’; सुविधांपेक्षा जास्त विद्यार्थी नको!

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; जड वाहनामुळे पुन्हा आलापल्ली-सिरोंचा मार्ग ठप्प

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1