• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

धावत्या एसटीचे चाक निखळले; २८ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 12, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
धावत्या एसटीचे चाक निखळले; २८ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!
Spread the Information

अहेरी: आगारातून सिरोंच्याकडे जाणाऱ्या एसटी बसचे धावत्या अवस्थेत मागील चाक अचानक निखळून तब्बल १०० फूट दूर जाऊन पडल्याची थरारक घटना मेळाराम गावाजवळ घडली. त्यावेळी बसमध्ये तब्बल २८ प्रवासी होते. चाक निखळल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४० ए.क्यू.-६१२५ क्रमांकाची एसटी बस अहेरी आगारातून सिरोंच्याकडे जात होती. मेळाराम गावाजवळ बस पोहोचताच अचानक तिच्या मागील बाजूचे चाक निखळले. धावत्या बसचे चाक निघून सुमारे १०० फूट अंतरावर जाऊन पडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षितपणे थांबवली आणि २८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.

विशेष म्हणजे, बस रस्त्यावर धावण्यापूर्वी ‘प्रि-ट्रिप इन्स्पेक्शन’ तसेच नट-बोल्टची तपासणी करण्यात आली होती, अशी माहिती अहेरी आगाराचे डेपो मॅनेजर खाडिलकर यांनी दिली. सध्या संबंधित बस सिरोंचा आगारात असून, अहेरी आगारात परतल्यानंतर तिची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाक नेमके कोणत्या कारणामुळे निखळले, हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र, बसची तपासणी झाल्याचा दावा असतानाही धावत्या बसचे चाक निखळल्याने एसटीच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नट-बोल्ट व्यवस्थित तपासले होते का? व्हील असेंब्लीमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

२८ प्रवासी… एक चाक… आणि थोडक्यात टळलेला अनर्थ!

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चाक निखळले त्याचवेळी समोरून एखादे वाहन आले असते किंवा रस्त्यावर दुचाकीस्वार अथवा पादचारी असता, तर परिस्थिती किती गंभीर झाली असती, याची कल्पनाच करवत नाही.
विशेष म्हणजे, धावत्या बसचे चाक निघून जाणे ही साधी घटना नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेने एसटी बसच्या तांत्रिक तपासणीची गुणवत्ता आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

केवळ चौकशी नको; जबाबदारी निश्चित करा!

घटनेनंतर संबंधित बसची तांत्रिक तपासणी करण्याबरोबरच बसच्या देखभाल-दुरुस्तीच्या नोंदी, नट-बोल्टची तपासणी, व्हील असेंब्ली आणि प्रि-ट्रिप तपासणीची प्रक्रियाही तपासणे आवश्यक आहे. अहेरी आगारातून धावणाऱ्या सर्व एसटी बसच्या चाकांची, नट-बोल्टची, ब्रेक सिस्टीमसह महत्त्वाच्या सुरक्षा घटकांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे.ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी एसटी ही प्रवासाची प्रमुख सुविधा आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड परवडणारी नाही.

एक चाक निखळले… २८ जीव वाचले!

चालकाच्या प्रसंगावधानामुळे २८ प्रवाशांचा जीव वाचला; मात्र ही घटना एसटी महामंडळासाठी मोठा इशारा ठरली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी बसच्या तांत्रिक तपासणीपासून देखभाल-दुरुस्तीपर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेची काटेकोरपणे तपासणी करण्याची गरज आहे.

Previous Post

जपतलाई दुर्घटनेनंतर आश्रमशाळांच्या सुरक्षेला ‘अलर्ट’; दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

Next Post

पतीच्या हट्टामुळे गरोदर माता व बाळाचा बळी,भामरागडमध्ये आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
भामरागड ग्रामीण रुग्णालयाला अखेर पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक

पतीच्या हट्टामुळे गरोदर माता व बाळाचा बळी,भामरागडमध्ये आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1