• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ;आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 22, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ;आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
Spread the Information

अहेरी : समाधान शिबिर हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करणारे हक्काचे व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बचाव होत आहे. अशा उपक्रमांमुळे शासनाचा पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान कारभार थेट जनतेच्या दारी पोहोचत आहे, असे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील भव्य समाधान शिबिराचे आयोजन अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, भामरागडचे उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील, भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे, एटापल्लीचे तहसीलदार निलेश होनमारे, सिरोंचाचे तहसीलदार अजय सकुंदरवार, मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे,सर्व गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, बालविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाधान शिबिरात अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील महसूल, पंचायत राज, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, आदिवासी विकास, समाजकल्याण, शिक्षण, ग्रामविकास, वन, अन्न व नागरी पुरवठा, रोजगार हमी, महावितरण, जलसंपदा, बँकिंग आदी विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली.यावेळी उत्पन्न, जात, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, नॉन-क्रीमी लेयर यांसारख्या आवश्यक दाखल्यांचे वितरण, शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकारणे, पीक विमा, कृषी योजनांचे मार्गदर्शन, महिला बचतगटांसाठी माहिती, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ, आरोग्यविषयक सेवा, आधार व इतर कागदपत्रांबाबत मार्गदर्शन अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.शेतीचे कामे सुरु असतानाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मान्यवरांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व विभागांच्या स्टॉलना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, दिवसभर ढगाळ वातावरण असूनही कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे जणू निसर्गानेही या लोकाभिमुख उपक्रमाला साथ दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांतील लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. अनेक नागरिकांना आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे व योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरण,धनादेश वितरण,शेतीचे अवजारे, खत ,बी बियाण्याचा वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला सर्वसामान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Previous Post

स्कूल बस सुरक्षेवर आता नियमित आढावा; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे एसपी एम. रमेश यांचे स्पष्ट निर्देश

Next Post

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1