गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डॉक्टरांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन (GTDA) ची स्थापना करण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमानिमित्त प्रथमच जिल्हास्तरीय ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील २०० हून अधिक आदिवासी डॉक्टरांनी उपस्थित राहून एकजुटीचा संदेश दिला.
गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे २१३ आदिवासी डॉक्टर विविध शासकीय व वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत असून, त्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी यांच्या संकल्पनेतून GTDA ची स्थापना करण्यात आली. यावेळी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन मास्टर प्लॅन तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना मडावी आणि डॉ. समता मडावी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. निर्मल पट्टे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, डॉ. पुरुषोत्तम मडावी (उपरसंचालक, मुंबई), डॉ. दीपचंद सोयाम (उपरसंचालक), डॉ. राजेंद्र रुसपाये (उपअधिष्ठाता, चंद्रपूर), डॉ. विनोद कुमरे (विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर), डॉ. धनंजय उडके (ACS), डॉ. वसंत कुमरे (कमांडंट, CRPF), डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रविण किलनाके आणि डॉ. रजनी तोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. तारकेश्वर उडके, डॉ. संदीप किरंगे, डॉ. सोनल कोटे, डॉ. मनोहर मडावी, डॉ. आशीष शेडमाके, डॉ. उमेश सिडाम आणि डॉ. पुरुषोत्तम कुमरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. प्रियदर्शिनी कोंडाडे, डॉ. प्रतिमा वधी आणि डॉ. एकता कुमरे यांनी केले, तर डॉ. चेतन कोटे आणि डॉ. केतन कुमरे यांनी आभार मानले.













