• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न; नगरसेवकासह चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 29, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न; नगरसेवकासह चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Spread the Information

अहेरी: येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात सोमवारी (२९ जून) छेडण्यात आलेल्या ‘ताला ठोको’ आंदोलनाला पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले. रुग्णालयाला कुलूप ठोकण्यासाठी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्यासह चार आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

यापूर्वीच नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपविभागीय अधिकारी, अहेरी यांच्यामार्फत निवेदन सादर करून महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून इतरही पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती. निवेदनात २८ जूनपर्यंत पदभरती न झाल्यास २९ जून रोजी ‘ताला ठोको’ आंदोलन आणि त्यानंतर ३० जूनपासून राजे विश्वेश्वरराव महाराज चौक येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.

त्यानुसार सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते महिला व बाल रुग्णालय परिसरात दाखल झाले. यावेळी रिक्त पदे तातडीने भरावीत या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांना सुरुवातीला पोलिसांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच थांबविले. त्यानंतर महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. डी. मडावी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे डेप्युटी डायरेक्टर यांच्याशी आंदोलनकर्त्यांचा संवादही घडवून आणला. मात्र, पदभरतीबाबत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय कायम ठेवला.

आंदोलनकर्ते रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्यासह चार जणांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. त्यामुळे संभाव्य तणाव टळला आणि रुग्णालयातील कामकाज सुरळीत सुरू राहिले.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन मागे घेण्यात आलेले नसून, प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय न झाल्यास पूर्वघोषणेनुसार ३० जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त;गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफची कारवाई

Next Post

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल; भीमराव कांबळेला फाशी, ‘रिअरेस्ट ऑफ रेअर’ म्हणत न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल; भीमराव कांबळेला फाशी, ‘रिअरेस्ट ऑफ रेअर’ म्हणत न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल; भीमराव कांबळेला फाशी, 'रिअरेस्ट ऑफ रेअर' म्हणत न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1