• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट;जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
May 13, 2026
in Gadchiroli
A A
0
बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट;जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती
Spread the Information

गडचिरोली: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच केलेल्या बिनागुंडा परिसराच्या ऐतिहासिक दौऱ्यात तालुकास्तरीय यंत्रणांनी दुर्गम भागात प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच शासनाच्या योजना गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचवाव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या निर्देशांच्या अनुषंगाने आज भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त क्षेत्रभेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात आयोजित या भेटीदरम्यान बिनागुंडा गावातील गोटूल येथे सभा घेण्यात आली. या सभेला बिनागुंडा परिसरातील कुवा कोडी, तुरेमर्का आणि फोदेवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या विविध विभागांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच निर्देश देण्यात आले.

यावेळी वनपट्टेधारकांना ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शासनाच्या विविध कृषी, आर्थिक आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. तसेच घरकुल योजना, आरोग्य सेवा, ग्रामपंचायत स्तरावरील सुविधा, वन विभागाच्या योजना आणि इतर शासकीय उपक्रमांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

सभेदरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, वन विभाग, आरोग्य विभाग, तहसील कार्यालय तसेच इतर विभागांशी संबंधित विविध अडचणी मांडल्या. संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या. तर वरिष्ठ स्तरावरील किंवा इतर विभागांशी संबंधित प्रश्नांबाबत समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून ग्रामस्थांना आश्वस्त करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी श्री. वानखेडे, क्षेत्रीय वन अधिकारी श्री. अमर भिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष धाकटे, पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, कोतवाल आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर;सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वाटप

Next Post

शहजाद भट्टी कनेक्शनचा संशय; आष्टीतील दोन तरुण एटीएसच्या रडारवर

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1