पोंभुर्णा : काँग्रेस नेते तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर वैभव पिंपळ शेंडे यांनी एका अत्यंत गंभीर आणि सर्वसामान्यांच्या हिताशी निगडित विषयावर महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे दिली आहे.
ही पत्रकार परिषद उद्या, दिनांक २७ डिसेंबर रोजी गुरुवारी दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. मात्र, परिषदेचे स्थळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. स्थळाविषयीची माहिती उद्या सकाळी सर्व पत्रकारांना कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
इंजिनीयर वैभव पिंपळ शेंडे यांनी सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार, वेबसाईट न्यूज पोर्टल तसेच सोशल मीडिया पत्रकारांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेतून महत्त्वाच्या विषयावर मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













