• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

नक्षलगडात विकासाची नवी पहाट; स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर कुवाकोडी आणि फोदेवाडा येथे आरोग्यसेवेचा शुभारंभ

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
November 25, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
नक्षलगडात विकासाची नवी पहाट; स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर कुवाकोडी आणि फोदेवाडा येथे आरोग्यसेवेचा शुभारंभ
Spread the Information

महेश गुंडेटीवार/गडचिरोली:भामरागड तालुक्यातील लाहेरीच्या पलीकडचा भाग म्हणजे अबूजमाड प्रवेशद्वार. घनदाट जंगल, डोंगराळ भूभाग आणि दीर्घकाळ नक्षलवादाचे प्राबल्य यामुळे छत्तीसगड सीमेजवळील हा परिसर विकासाच्या प्रवाहापासून दशके दूर राहिला होता. परंतु आता परिस्थिती बदलू लागली आहे. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी प्रथमच प्रशासनाने या नक्षलग्रस्त भागात आरोग्य सुविधा पोहोचवत इतिहास रचला आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

गुंडेनूर नाल्याच्या पलीकडील गावांना आतापर्यंत उपचारांसाठी नाले ओलांडत, डोंगर-दऱ्या पार करत तीन ते चार तास पायपीट करून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागत होते. परंतु आता कुवाकोडी आणि फोदेवाडा या दोन्ही गावांत आधुनिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या उपकेंद्रांच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. दुर्गम भूभाग, वाहनासाठी अयोग्य रस्ते, वीजेचा अभाव, तसेच नक्षलवादाचा धोका,अशा कठीण परिस्थितीत तब्बल 12 वेळा निविदा काढूनही कोणी कंत्राटदार पुढे येत नव्हते. शेवटी भगवती बिल्डर्स यांनी हे आव्हान स्वीकारून जनरेटरच्या साहाय्याने विजेअभावी उपकरणे चालवत बांधकाम पूर्ण केले. कामकाजादरम्यान अनेक मजुरांना मलेरियाचे संकटही भोगावे लागले, पण त्यांनी हार मानली नाही.

आज भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (मन्नेराजाराम, आरेवाडा, लाहेरी), दोन आरोग्य पथके (ताडगाव, कोठी) आणि दोन मोबाइल युनिट कार्यरत आहेत. लाहेरी प्रा.आ. केंद्रांतील नऊ उपकेंद्रांत एकूण 43 गावांचा समावेश असून, दहा हजारांहून अधिक लोकसंख्या येथे राहते. या भागातील आरोग्य सेवेला चालना मिळण्यासाठी कुवाकोडी आणि फोदेवाडा उपकेंद्रे महत्त्वाची ठरणार आहेत. जिल्ह्याच्या विकास यात्रेत ही पायरी ऐतिहासिक मानली जात आहे. नक्षलग्रस्त भागात प्रशासनाने आरोग्य केंद्र उभारून दाखवलेली इच्छाशक्ती आणि समर्पण यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दृष्टी साकार होताना दिसत आहे.

दुर्गम भागात पहिल्यांदाच फ्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर उभे करून दर्जेदार आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित झाली असून, लवकरच ग्रामपंचायत भवनही पूर्ण होईल.आरोग्य सेवा, शुद्ध पाणी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाहेरी वरून मनुष्यबळ देऊन सेवा पुरविण्यात येत आहे.
-सुहास गाडे
मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली

Previous Post

सिरोंचा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

Next Post

28 माओवाद्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन;हिंसाचाराच्या विरोधात शांततेचा निर्णायक विजय

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1