• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आलिशान वाहनातून सागवान तस्करी;३ लाखांचा मुद्देमालासह दोन आरोपींना अटक

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 22, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आलिशान वाहनातून सागवान तस्करी;३ लाखांचा मुद्देमालासह दोन आरोपींना अटक
Spread the Information

गडचिरोली:रात्रीच्या सुमारास आलिशान वाहनातून सागवान तस्करी करताना वन विभागाने सापळा रचून तब्बल २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही घटना मुलचेरा तालुक्यातील खुदिरामपल्ली येथे २१ जून रोजी उघडकीस आली.या घटनेत वन विभागाने दोन आरोपीना ताब्यात घेऊन न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्यांना २४ जुलै पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

प्राप्त माहितीनुसार जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात सागवान लठ्ठे तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती २० जुलै रोजी पेडीगुडम वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली.या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पेडिगुडम वनपरिक्षेत्रातील सुंदरनगरचे वनरक्षक गणेश बोडा,मोहूर्लीचे वनरक्षक एम व्ही कोकणारे,चौकीदार असीम तालुकदार आणि दामोदर पेंदाम यांनी खुदिरामपल्लीच्या नाल्यावर रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान मारुती सुजूकी एल एक्स झेन (एमएच ३८-२२३३) या वाहनाची तपासणी केली.

सदर आलिशान वाहनातून त्यांना ७ सागवान लठ्ठे तस्करी होत असल्याचे आढळले.लगेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर वाहन आणि त्यातील वाहन चालक उत्तम शामल दास (३४) (वाहन चालक) आणि सोबत असलेले अरुण अधीर गाईन (३३) दोघेही राहणार खुदिरामपल्ली ता. मुलचेरा या दोन इसमांची विचारपूस केली असता त्यांनी येलचिल आणि वेलगुर जंगल परिसरातून सदर सागवान लठ्ठे आणत असल्याचे सांगितल्याची माहिती वनविभागाने दिली.

वन विभागाने मध्यरात्री १.४५ वाजेपर्यंत पंचनामा आणि जप्तीनामाची कारवाई केली.वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार यात ७ सागवान लठ्ठे ज्याची किंमत ४२ हजार ५०० रुपये आणि चारचाकी वाहन ज्याची किंमत २ लाख ५० हजार रुपये असे वनविभागाने तब्बल २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले.पेडिगुडमचे प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी एन एस वाडीघरे आणि त्यांच्या चमूने सदर दोन आरोपीना २१ जुलै रोजी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ जुलै पर्यंत वन कोठडी सुनावली.

आलापल्ली वन विभागात चाललंय तरी काय

नुकतेच मागील जून महिन्यात आलापल्ली वन विभागातील याच पेडीगुडम वनपरिक्षेत्रातील गोमणी उपक्षेत्रात अवैध वृक्षतोड प्रकरण चांगलाच गाजला होता. येथील वनपाल एन टी सिडाम आणि वन रक्षक सचिन मस्के यांच्यावर वन विभागाने निलंबनाची कारवाई देखील केली होती. वन सुरक्षेबाबत गंभीर दिरंगाई, वरिष्ठांना चुकीची माहिती सादर करणे, आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सदर प्रकरण ताजे असतानाच आता मुलचेरा उपक्षेत्रातील सुंदरनगर बिटातील खुदिरामपल्ली येथे मोठी कारवाई करण्यात आल्याने या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड आणि सागवान लाकडांची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फर्निचर मार्टचे दुकान आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध सागवान तस्करीचा गोरख धंदा सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुढील तपासात आणखी बरेच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Previous Post

बत्तीगुलमुळे अंधारातच जगावे लागते जीवन;ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल

Next Post

राज्याचा गृहराज्यमंत्री आईच्या नावाने डान्स बार चालवितो यांना लाज कशी वाटत नाही.?

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
राज्याचा गृहराज्यमंत्री आईच्या नावाने डान्स बार चालवितो यांना लाज कशी वाटत नाही.?

राज्याचा गृहराज्यमंत्री आईच्या नावाने डान्स बार चालवितो यांना लाज कशी वाटत नाही.?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1