कंत्राटदाराचे दुर्लक्ष
गोंडपिपरी-
प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत विठ्ठलवाडा सह सात गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित आहे,मात्र पिण्याच्या शुद्ध पाण्यातून नारू बाहेर आल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे.हा सर्व प्रकार संबंधित कंत्राटदार यांच्या दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोप तृप्ती चुणारकर यांच्यासह नागरिकांनी केला आहे.
गोंडपीपरि तालुक्यातील नवेगाव येथील नळातून नारू सदृश जंतू बाहेर यायला लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे बाहेरून पाणी घेऊन पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा मुख्य प्लान्ट हा विठ्ठलवाडा येथे असून तेथूनच पाणी शुद्धीकरण कारून सात गावांना पुरवल्या जाते . मात्र या सर्व गंभीर बाबीकडे संबंधित कंत्रातदाराचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने त्या जलशुद्धीकरन केंद्रात वारंवार साफसफाई होणे गरजेचे आहे ,ते होत नसल्यानेच हा प्रकार घडत असावा असा नागरिकांचा अंदाज आहे तेव्हा सदर प्लान्ट हा स्वछ करूनच पाण्याचा पुरवठा कारवा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती चुणारकर,ग्राम पंचायत सदस्य नितेश मेश्राम,भाऊजी चनेकर आदींनी केली आहे.