चिमूर : – तालुक्यातील शंकरपूर येथील हनुमान किल्ला मंदिर येथील हनुमान मूर्ती ची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली असून ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
वृंदावन धाम हनुमान किल्ला मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताह होत असून याला शासनातर्फे क दर्जाचा पर्यटन स्थळ म्हणून मान मिळालेला आहे. रविवारच्या मध्य रात्री समाजकंटकांनी या मूर्तीची विटंबना केली आहे. सोबतच मंदिरात असलेले फोटो व घड्याळ फोडले आहे .यासोबतच बाजूलाच असलेल्या भिंती आणि शंकराची पिंड यांचे सुद्धा समाजकंटकांनी विटंबना केली आहे. तसेच दानपेटी सुध्दा फोडण्याचा प्रयन्त केला सकाळी मंदिराचे सफाई कामगार स्वच्छता करण्यासाठी गेले असता ही बाब उघडकीस आली. त्यांनी तात्काळ मंदिराचे ट्रस्टी सावरकर व शामराव शेंडे यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ पोलीस चौकीला या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राऊत ,सहायक पोलीस निरीक्षक जांभुळे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून आरोपी शोधमोहीम सुरू केली आहे
शंकरपुरचे आराध्य दैवत हनुमान कील्ला येथील हनुमान मंदीरातील हनुमानाच्या मुर्तीची अज्ञात समाजकंटकांनी वीटंबना केली. घटनास्थळी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे शैलेश गायकवाड यांनी प्रत्यक्ष पहानी केली असता हनुमान मुर्तीचे उजव्या बाजूचे हात खंडीत झालेले दिसुन आले तसेच बाजूला असलेली दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेचा वंचित बहुजन आघाडी निषेध करीत असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या समाज कंटकाला पोलीस प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम हाती घेऊन अटक करावी अशी मागणी वंचित बहुजण आघाडीचे शैलेश गायकवाड यांनी केली आहे.