भारतानं पाकिस्तानला गुडघ्यावर आणल्यानंतर आता त्याच्या पाठिशी तूर्कीए उभा राहिला आहे. आम्ही पाकिस्तानसोबत आहोत असं म्हणत तूर्कीएनं पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला. दरम्यान यानंतर भारतानं आता तूर्कीएवर मार्बल स्ट्राईक केला आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील व्यापा-यांनी तूर्कीएसोबतचा व्यापार बंद केला आहे.
तसंच कॅटने देशभरातील व्यावसायिकांना तुर्की आणि अझरबैजानला न जाण्याचं आवाहन केलं आहे. कारण भारतातून असंख्य पर्यटक हे तूर्कीएला जात होते. मात्र, आता तुर्कीएनं पाकिस्तानला साथ दिल्यामुळे याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
मार्बल व्यापारी आणि टुअर एजन्सींनी तूर्कीए आणि अझरबैजानला धक्का दिला आहे. मार्बलनंतर तूर्कीएच्या पर्यटनावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या निर्णयाचं इंडियन चेंबर आणि कॉमर्स टूरिझमकडून स्वागत करण्यात आलं आहे.
पाकिस्तानला पाठिंबा देणं तूर्कीएला चांगलंच महागात पडणार आहे. कारण पर्यटन असो किंवा तूर्कीएसोबतचा व्यापार यामुळे तूर्कीएला मोठा फायदा होत होता.. मात्र, आता पाकिस्तानला साथ दिल्यामुळे तूर्कीएला यांची किंमत मोजावी लागेल.













