पाटस टोल प्लाझा येथे ईएसआयसी नोंदणी व दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस (दौंड): पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे आणि मार्को लाईन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटस टोल प्लाझा येथे बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये ईएसआयसी नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली, तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या ईएसआयसी संबंधित समस्या होत्या, त्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर व्यवस्था असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या वेळी पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे चे प्रोजेक्ट हेड फनी कुमार मुला, एच आर मॅनेजर राजेश सिंग, मार्कोलाईनचे प्रोजेक्ट मॅनेजर संदीप लावरे, प्रोजेक्ट मॅनेजर धर्मा शेळके, पाटस टोल प्लाझाचे मॅनेजर प्रवीण कांबळे, सिस्टीम मॅनेजर समाधान पवार, टोल मॅनेजर कमलेश पाटणे, असिस्टंट प्लाझा मॅनेजर इरफान शेख, मार्कोलाईन एच आर मॅनेजर विठ्ठल सरडे,इलेक्ट्रिकल इंजिनियर रोहित क्षीरसागर, डॉक्टर स्वप्नील चव्हाण, डॉक्टर निंबाळकर यांच्यासह बारामती, दौंड आणि कुरकुंभ येथील कर्मचारी आणि पाटस टोल प्लाझाचे अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रोजेक्ट हेड फनी कुमार मुला यांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. एचआर मॅनेजर राजेश सिंग यांनी सांगितले की, कंपनी नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत असते आणि यापुढेही ते सुरू ठेवले जातील. मार्कोलाईनचे प्रोजेक्ट मॅनेजर संदीप लावरे यांनी कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आभार मानले.
पाटस टोल प्लाझाचे मॅनेजर प्रवीण कांबळे यांनी या शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा पुरेपूर लाभ घेतला आणि आपल्या समस्यांचे निराकरण केले. या शिबिरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते आणि त्यांनी आयोजकांचे आभार मानले.













