शिर्डी येथे जनार्धन नामदेव राऊत यांना ‘कार्यगौरव पुरस्कार – 2025’ प्रदा
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत

शिर्डी येथील समता पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळ, उत्तर अहिल्यानगर आणि शिर्डी नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक नेते मा. श्री. जनार्धन नामदेव राऊत यांना ‘कार्यगौरव पुरस्कार – 2025’ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देण्यात आला.
मा. श्री. राऊत यांनी एक सामाजिक नेतृत्व म्हणून नेहमीच आपल्या पदाला न्याय दिला आहे. त्यांनी विविध मार्गांनी सामान्य लोकांची सेवा केली आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत, सबंध महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरलेल्या त्यांच्या योगदानाला गौरवण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे, दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाचे मा. खासदार सुजयदादा विखे पाटील, महाराष्ट्र नाभिक मंडळाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सयाजीराव आण्णासो झुंजार, उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब व्यवहारे, जिल्हाध्यक्ष मा. श्री. योगेशभाऊ शिंदे, जिल्हा संघटक मा. श्री. काकासाहेब वाघमारे, मंदिर बांधकाम समिती, शिर्डीचे अध्यक्ष मा. श्री. संजय बिडवे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मा. सौ. प्रियंकाताई जाधव, समाजसेवक मा. श्री. सुनिलभाऊ गायकवाड आणि समता पतसंस्था, शिर्डीचे मा. श्री. शशिकांत सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मा. श्री. जनार्धन नामदेव राऊत यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि या पुरस्कारामुळे समाजाप्रती आपली जबाबदारी अधिक वाढली असल्याचे सांगितले. तसेच, यापुढेही समाजासाठी समर्पितपणे कार्य करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन समता पतसंस्थेने केले असून, मा. श्री. काकासाहेब कोयटे यांनी संस्थेच्या वतीने मा. श्री. राऊत यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













