दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी ढमाले यांची बिनविरोध निवड
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस : दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी ढमाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापूर्वीचे संघाचे अध्यक्ष विजय नागवडे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी शिवाजी ढमाले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
तसेच उपाध्यक्षपदी स्वाती कोळपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
यापूर्वीचे माजी उपाध्यक्ष जयवंत गिरीमकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते यावेळी स्वाती कोळपे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे स्वाती कोळपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ए आर मिसाळ यांनी काम पाहिले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे,बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ,संचालक पोपटराव ताकवणे , सत्वशील शितोळे, राहुल आव्हाड,सागर पाटील जाकीर तांबोळी,समाधान शिंदे , महेश शितोळे, योगेश जाधव व संचालक मंडळ उपस्थित होते













