शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंग व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर (ता. शिरूर, जि. पुणे) – शिरूर पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम ७४, ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते १४ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत मौजे आंबळे (ता. शिरूर) येथे फिर्यादीच्या राहत्या घरी आणि श्री स्वामी समर्थ हॉटेलसमोर आरोपी भानुदास चंद्रकांत अनुसे (रा. अनुमेवाडी, कळवंतवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याने फिर्यादीच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. यावेळी त्याने फिर्यादीचा हात धरून तिच्या गालावर हात फिरवला आणि “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत विनयभंग केला. तसेच, फिर्यादी व तिच्या पतीस धक्काबुक्की करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी फिर्यादीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पो. हवा. १२५२ भोते करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पो. नि. संदेश केंजळे कार्यरत आहेत.













