कोल्हार │ जागतिक महिला दिनानिमित्त विद्या विद्यापीठ आणि व्हिजन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमृता गणेश सोमवंशी आणि ललिता जगन्नाथ तांबे या दोघींना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार पद्मश्री डॉ. कल्पनाताई सरोज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विद्या विद्यापीठाचे नामदेवराव गुंजाळ आणि व्हिजन अकॅडमीचे हर्षवर्धन गुंजाळ उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल अमृता सोमवंशी यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली असून, ज्ञानदानाचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “या यशाचे श्रेय माझे आई-वडील, शिक्षक-गुरु, सासू-सासरे, पती, मुले आणि विद्या विकास पब्लिक स्कूल, बाभळेश्वर यांच्या पाठिंब्यामुळेच मिळाले आहे.”
या विशेष सन्मानामुळे दोन्ही शिक्षकांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी नवीन प्रेरणा मिळाली आहे.













