शालेय विद्यार्थ्यांसाठी बेकायदेशीर चित्रपट स्क्रीनिंग; कारवाईचा इशारा
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
न्हावरे (ता. शिरूर) – गावातील गूंजन सिनेमा थिएटरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी एका विशेष चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. मात्र, हा चित्रपट इंटरनेटवरून बेकायदेशीरपणे डाउनलोड करून प्रोजेक्टरद्वारे दाखवण्यात आल्याची तक्रार संबंधित संस्थेकडे दाखल झाली आहे.
या प्रकारावर सिनेमाच्या निर्मिती संस्थेने तीव्र आक्षेप नोंदवला असून, बेकायदेशीर पद्धतीने चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो डाउनलोड करून प्रदर्शित करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, डिजिटल पायरेट्स कायद्यांतर्गत दोषींवर लाखों रुपयांचा दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
गूंजन सिनेमा थिएटरच्या व्यवस्थापकांनी सोशल मीडियावर कोणतीही चुकीची माहिती किंवा गैरप्रचार पसरवू नये, अशी विनंती केली आहे. याप्रकरणी पुढील अधिकृत कारवाई होणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे












