भंडारा, दि. 23: राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा संजय सावकारे हे दि.25 व 26 जानेवारी, 2025 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे. रवि भवन नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडारा सिल्क तालुका मोहाडी येथे दुपारी 4.00 वाजता प्रयाण करतील.
सायंकाळी 5.45 वाजता भंडारा सिल्क तालुका मोहाडी येथील श्री.सोनकुसरे यांचे ऑटोमॅटिक रेलिंग युनिट येथे आगमान व भेट, सायंकाळी 6.00 येथून शासकीय वाहनाने भंडारा सिल्क तालुका मोहाडी येथून भंडाराकडे प्रयाण व सा.6.20 वाजता मुलभूत सुविधा केंद्र,जगनी,जिल्हा भंडारा येथील टसर व तुती रेशिम उद्योग येथे आगमान व पाहणी, सा.6.40 येथून भंडारा कडे प्रयाण करतील.व शासकीय विश्रामगृह भंडाराकडे खाना होतील. सांयकाळी 7.25 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमान व राखीव
तसेच रविवार 26 जानेवारी,2025 रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून भंडारा पोलिस मुख्यालयाचे कवायत मैदानाकडे ध्वजारोहणासाठी खाना. सकाळी 9 .00 वाजता भंडारा पोलिस मुख्यालयाचे कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थिती राहतील. सकाळी 11.00 वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने भुसावळकडे प्रयाण करतील.













