भद्रावती :- पदावली भजन मंडळातुन लहान मुलांवर योग्य संस्कार घडतात असे डॉ. अंकुश आगलावे यांनी जय बजरंग पदावली भजन मंडळ, नागलोन येथील पदावली भजन स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.
वारकरी संप्रदाय, श्री गुरूदेव सेवा मंडळ सारखेच पदावली भजन मंडळ असून त्याचा लोप पावत असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले. नागलोन येथील युवा पिढींनी पदावली भजनाचे अध्ययन करून स्पर्धेचे आयोजन केले. पदावली भजनाचा लोप पावत असल्याने या भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेव्दारे पदावली भजनाचे पुनर्जिवन युवा पिढीव्दारे करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी डॉ. आगलावे यांनी म्हटले की नागलोन गांव हे तंटामुक्ती गांव आहे या गावातील भांडणाच्या तक्रारी नसुन गांव हे पुर्णपणे तंटा मुक्त आहे. तसेच एकही तक्राराची नोंद पोलीस स्टेशन मध्ये नाही. डॉ. आगलावे यांनी सर्व भजन मंडळांना आवाहन केले की महाविकास आघाडी सरकारच्या किराना दुकानातुन दारू विक्रीचा निषेध सर्व भजन मंडळाने ठराव मांडून करावा.
या स्पर्धेत भाग घेणारे भजन मंडळातील उत्कृष्ठ ढोलकी वादक, पदगान ,गोंळण, पोषाख, व उत्कृष्ठ छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा सादरीकरण करणारे भजन मंडळास वैयक्तिक बक्षीसे देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक विनीत घागे ठाणेदार माजरी पोलीस स्टेशन तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव गमे अ. भा. गुरूदेव सेवा मंडळ गुरूकंूज आश्रम होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण सुर, जि.प.सदस्य, चंद्रपूर, चिंतामणरावजी आत्राम पं.स.सदस्य माजरी, अजितसिंगजी देवरे पोलीस सहा. निरीक्षक माजरी, जिल्हा सेवाधिकारी अ.भा.श्री गुरूदेव सेवामंडळचे प्रा. रूपलाल कावळे, ग्रामगीताचार्य अतुल खापने, ग्रामसेविका नागलोन दर्शना इंदोरकर, सरपंच नागलोन रवी ढवस, उपसरपंच नागलोन शुभांगी ढवस, माजी सरपंच नागलोन विदया ढवस, पोलीस पाटील नागलोन त्रिमुर्ती महाजन, तंटामुक्ती अध्यक्ष कवडू चोपने, ग्रा.पं. सदस्य गजानन ढवस, ग्रा.पं. सदस्य प्रदीप सोयाम, ग्रा.पं. सदस्य मनिषा ढवस, ग्रा.पं. सदस्य पुजा ढवस, सुजा महातळे ग्रा.पं. सदस्य, गजानन वासेकर अध्यक्ष गुरूदेव सेवा भजन मंडळ नागलोन, अध्यक्ष जय बजरंग पदावली भजन मंडळ नागलोन, अध्यक्षा जय जगन्नाथ महिला भजन मंडळ नागलोन, व मंडळाचे सदस्य, भजन मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते .