बीड/ परळी :- बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंकजा मुंडे आणि खासदार डाॅ प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भाविकासाठी खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. देशभरातून लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या तोबा गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. पंकजा मुंडे आणि खासदार डाॅ प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांसाठी खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भा.ज.पा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,जेष्ठ नेते श्रीहरी(बाबूजी)मुंडे, श्रीराम मुंडे,नगरसेवक पवण मुंडे, रिपाई चे नेते भास्कर नाना रोडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष संतोष सोळंके,किशोर केंद्रे,सचिन गित्ते,राजेंद्र ओझा,अरुण पाठक, राम तोष्णीवाल,अश्विन मोगरकर,योगेश पांडकर, बाळासाहेब फड,सुशील हरंगुळे,डॉ.बलविर मुंडे,सुरेश सातभाई,राजेश आघाव,नितीन मुंडे,दिपक नागरगोजे,गोविंद मुंडे,विशाल मुंडे,महादेव कंडुकटले,पवन तोडकर,कुणाल चाटे, अश्विन गित्ते,चैतन्य मुंडे,आकाश मुंडे,दिपक कराड,नकुल वाघमोडे, शुभम बदने,अमोल दहिफळे,धिरज कांदे उपस्थित होते.