वरोरा (चंद्रपूर ): तालुक्यातील कोंढाळा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले असून ५ जनावरांचा आगीत होळपळून मृत्यू झाल्याची घटना आज दि.२ मार्च रोजी उघडीस आली. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास ८ लाखाचे नुकसान झाले.
शेतकरी रवींद्र अहिरकर यांचे येन्सा शेतशिवारात शेत आहे. जवळच असलेल्या कोंढाळा गावात त्यांचे घर असल्याने नेहमीप्रमाणे शेतीचे काम आटपुन शेतीउपयोगी साहित्य तसेच जनावरांना गोठ्यात बांधून गावाला परतले. मात्र सकाळी शेतात गेले असता गोठ्याला आग लागली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही आग रात्रीच लागली असल्याचे जनावरांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता एका बैलाचे प्राण वाचविण्यास यश आले. मात्र गोठ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.यामध्ये गोठ्यात असलेला ८ क्विंटल कापूस, रासायनिक खताच्या १० पिशव्या , शेती उपयोगी साहित्य तसेच दोन बैल , एक गाय ,गोरा , कालवड यांचा आगीत होरपळून मृतू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास 8 लाखाचे नुकसान झाले आहे.आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही मात्र हा घातपात असून कोणीतरी आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दोषींवर करवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अविनाश पायघन , लक्ष्मण डवरे , भानुदास बोधाने तसेच गावकऱ्यांनी केली आहे.