चिमूर :- सध्या राज्यात महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे महावितरण चर्चेत असून घरगुती वीजबिल शेतकऱ्यांचे बिल लोडशेडिंग वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा या कारणामुळे तसेच महावितरण च्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य, शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत. असाच प्रकार तालुक्यातील सिरपूर येथे विजबिल देयकाची मुदत संपल्यानंतर महावितरण ने गावात वीज बिलाचे वाटप केले त्यामुळे महावितरणच्या विरुद्ध गावकऱ्यात रोष निर्माण होऊन असंतोष निर्माण झाला आहे.
महावितरण दर महिन्याला घरगुती वीज वापराचे वीजबिल भरण्याच्या मुदतीत पाठवीत असते आणि सर्वसामान्य जनते सहित सर्वजण आपआपले बिलाचे भरणा करीत असतात. परंतु यावेळेस महावितरणच्या भोंगळ कारभाराचा प्रकार पहावयास मिळाला असून बिलदेयके भरण्याची मुदत संपल्यानंतर बिलाचे वाटप सिरपूर या गावांमध्ये करण्यात आले. त्यामुळे वीजबिल बघताच नागरिकांत रोष निर्माण झाला कारण 28 फेब्रुवारी ही विजदेयकाची भरणा करण्याची शेवटची तारीख होती आणि यानंतर भरले तर 10 रुपये जास्तीचे भरून वीज बिल भरणे अशी बिलात नमूद असल्याने गावकऱ्यात असंतोष निर्माण झाला सर्वात मोठी गोष्ट ही की वीजबिल हे 1 मार्चला वितरित करण्यात आले त्यामुळे आता गावकऱ्यावर 10 रुपयांचा जास्तीचा आर्थिक भुर्दंड पडणार असून संपूर्ण गावातील जनतेला आगाऊ रुपये भरावे लागेल त्यामुळे पैसे जमा करायची ही नवीन शक्कल महावितरणाची तर नाहीना अशी चर्चा गावकऱ्यात सुरू आहे. सर्वसामान्य जनता ही वीज देयके नियमित वेळेत आपली सर्व कामे सोडून भरत असते कारण महावितरण वीजबिल थाबल्यास वीज पुरवठा खंडित करतात पण मुदत संपल्यावर वीजबिल आगाऊ पैसे देऊन कसे भरायचे या विवंचनेत गावकरी आहेत. तेव्हा या बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वीज बिलाचा गावकऱ्याचा प्रश्न सोडवावा आणि अश्याप्रकारे होणारी चूक टाळावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.