राहुरी : शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरे बु.ता राहाता जि. अहिल्यानगर येथे मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व शालेय साहित्याचा वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. पाथरे बु गावचे ग्रामपंचायत सरपंच मा श्री उमेश गिताराम पा. घोलप यांच्या सहकार्यातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सिंधुताई एकनाथराव विखे पाटील रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा मा. सौ. धनश्रीताई सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रवरेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण आणि सर्वोत्तम शिक्षण हाच हेतू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणातून पुढे जाण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम शालेय पातळीवरती सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहोचत आहे. शिक्षणासोबतच प्रवरेच्या माध्यमातून संस्कृतीचा ही जतन होत आहे. सहकारातून समृद्धीकडे या माध्यमातून प्रवरा गणेशोत्सव नवरात्र महोत्सव दांडिया बिल्डिंग प्रवरा अशा विविध उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थी हे कुठेही कमी नाही याची जाणीव विद्यार्थ्यांनी करून दिली जाते. विद्यार्थीची जेवढी चिंता पालकांना आहे तेवढीच संस्थेला आहे त्यामुळे एकत्रित काम करून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करूया यासाठी विद्यार्थ्यांनाही देखील पुढाकार घेतला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यावेळेस कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच मा श्री उमेश पा. घोलप .मा श्री भाऊसाहेब बाबुराव पा. घोलप मा. शिवाजी नरहरी पा. घोलप मा. अशोकराव पा. कडू,मा. आरिफभाई शेख, दत्तात्रय पा. कडू, सौ.परीगा कडू, विद्यालयाचे प्राचार्य श्री के बी बारगुजे सर, उपप्राचार्य सौ. वाणी मॅडम, पर्यवेक्षक श्री तांबे सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री घुगे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे इनचार्ज डॉ. संदीप म्हस्के सर यांच्यासह , पालक,ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर सेवक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.