अहिल्यानगर : महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपच्या घटना वाढत चालल्या असुन भावाभावात, शेतकऱ्यांमध्ये आपापसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणार अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट् राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक- दादासाहेब जंगले यांनी सांगितले*
शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असुन दळणवळणासाठी शेतीला शेतीपूरक व्यवसायासाठी दर्जेदार शेत रस्त्याची गरज आहे तुकडेवारीसह विभाजनानंतर शेतरस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकरी शेतात वास्तव्यात असल्यामुळे शाळकरी मुले,वृद्ध,अपंग यांची शेतरस्त्यांअभावी मोठी रोजची जीवघेणी कसरत होताना दिसत आहे शेतरस्त्यांच्या समस्येमुळे फौजदारी स्वरूपांच्या घटना दिवसेंदिवस घडताना निदर्शनात येत आहे एका बाजूला निसर्गही शेतकऱ्यांची परीक्षा घेत असून शेतमाला हमीभाव मिळत नाही त्याचबरोबर शेतरस्त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज बनवण्यापासून प्रशासकीय कार्यालय ते न्यायालयीन लढा जीव घेणा बनला आहे त्याच्या पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत यामध्ये अनेकांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या आहेत मोठ्या कष्टाने पिक उभे करायचे आणि त्याला बाजारात घेऊन जाता येत नसेल तरी यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय यासाठी पुन्हा नव्याने येणाऱ्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकार सत्तेत येताच शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष संपवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले