अहिल्यानगर जिल्ह्यात 55 हजार क्विंटल लाल कांदा आला, वाचा बाजारभाव
अहिल्यानगर :उन्हाळ कांदा आवक घटली असून आज दिवसभरात 680 क्विंटलची आवक झाली. मात्र लाल कांद्याची आवक वाढत असून आज एकट्या नगर जिल्ह्यात 55 हजार क्विंटल कांदा आला.
आज कांद्याला कमीत कमी 2800 रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
आज 30 नोव्हेंबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात लाल कांद्याची 48 हजार तर नाशिक जिल्ह्यात 16 हजार क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला नगर बाजारात 3700 रुपये, येवला बाजारात 3250 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 3500 रुपये, नागपूर बाजारात 03 हजार रुपये, भुसावळ बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला.
कांद्याला अहमदनगर बाजारात 4400 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 04 हजार 200 रुपये, कळवण बाजारात 5800 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 6001 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 900 रुपये दर मिळाला.