मूल प्रतिनिधी– मागील 13 वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका औद्योगिक विकासात आघाडीवर असून, एकूण 11 उद्योगांची स्थापना झाली आहे. 2011 पासून येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगांच्या स्थापनेला सुरुवात झाली, ज्यामध्ये 4075 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. यापैकी 6 उद्योग प्रस्तावित असून, या उद्योगांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
मूल तालुका एकेकाळी शेतीप्रधान असून, 2009 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांची आमदार म्हणून निवड झाल्यापासून तालुक्यात औद्योगिक प्रगती सुरू झाली. 2011 पासून विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत तालुक्यात उद्योगांची स्थापना केली. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे औद्योगिक वसाहतीत “जी.आर. कृष्णा फेरो अलाईड”, “ग्रेटा एनर्जी”, “राजुरी स्टील अलाय” यांसारखे उद्योग स्थापन झाले आहेत
मुलात 6 प्रस्तावित उद्योगांमध्ये एकूण 2600 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. नवीन उद्योगांच्या स्थापनेनंतर एकूण 4045 लोकांना नोकरी तसेच हजारो युवकांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार आहे.