मूल प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात यावेळी लढत चुरशीची आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांचे कडवे आव्हान स्वीकारून विजयाचा झेंडा रोवणे म्हणावे तेवढे सोपे नाही हे चित्र सर्वच विधानसभा क्षेत्रात सध्या तरी दिसत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूल येथील मुस्लिम समाजाच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात विकासासाठी एकत्र येत राज्याचे वनमंत्री डॉ.सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे.शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात, मुस्लिम समाजाच्या या पाठिंब्यामुळे महत्त्वपूर्ण परिवर्तन घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या ठिकाणी उपस्थित समाज नेत्यांनी मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांचा गौरव केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मुनगंटीवार यांनी केवळ धार्मिक सलोख्याचेच नव्हे, तर सर्वसमावेशक विकासाचे आदर्श पाडले आहेत. त्यांनी केलेले शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सुधार कार्य मूल तालुक्याच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरले आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील निवडणुकीच्या लढाईत नव्या रंगत निर्माण झाली असून, डॉ. मुनगंटीवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मोठा बळकटीकरण मिळाल्याचे मानले जात आहे.
सदर बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.नितीनभाऊ भटारकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा.डॉ.मंगेश गुलवाडे, राष्ट्रवादी मुल तालुकाध्यक्ष मंगेशभाऊ पोटवार,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा.सिकंदर शेख,मूल तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आशु खान , राष्ट्रवादी मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष रोहित कामडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष धाराताई मेश्राम, मालाताई शेंडे,सुवर्णाक्षी रामटेके, रंजना सुखदेवे व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.