मूल प्रतिनिधी:
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, ना. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मूल येथे 8 नोव्हेंबर 2024 रोजी ऐतिहासिक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. इको पार्क, मूल येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये युवक, युवती, वयोवृद्ध अशा विविध वयोगटातील हजारो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीला सुरुवात होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, जयघोष व घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.
डॉ. मुनगंटीवार यांचे विकासकेंद्रित नेतृत्व, सर्व समाजघटकांसाठी असलेली कळकळ, आणि प्रामाणिक कार्यप्रणाली यामुळेच मतदारांमध्ये त्यांच्याविषयी दृढ विश्वास निर्माण झाला आहे. “सुधीरभाऊ 100 टक्के निवडून येणार म्हणजयेणारच!” असा निर्धार व्यक्त करत मतदारांनी आपल्या समर्थनाची पुन्हा एकदा ग्वाही दिली. ही रॅली केवळ प्रचारासाठी नसून सुधीरभाऊंना मिळणाऱ्या व्यापक पाठिंब्याचे प्रतीक ठरली.
रॅलीदरम्यान महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते आणि भाजपा पदाधिकारी देखील उपस्थित होते, ज्यांनी सुधीरभाऊंच्या विजयासाठी जनतेला प्रेरित केले.