मूल प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून मूल तालुक्यातील अनेक लोकांचा बळी घेणारी *T-83* ही नरभक्षक मादी वाघीण अखेर जेरबंद करण्यात आली. आज सकाळी ५:३० वाजता चिचपल्ली परीक्षेत्रातील जानाळा नियतक्षेत्रातील कं. क्र. 717 मध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मोठे यश मिळाले.
या दोन वाघांपैकी मादी वाघीण जेरबंद करण्यात यश आले असून नर वाघावर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. वाघांना पकडण्यासाठी वनविभागाने ड्रोन आणि कॅमेऱ्यांचा वापर केला. वाघांचे वाढते हल्ले लक्षात घेऊन शासनाने मागील आठवड्यात वनविभागाला ड्रोन पुरवले होते. या ड्रोनच्या मदतीने वाघांची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्यासाठी सापळे लावण्यात आले होते. वाघ वारंवार हुलकावणी देत असल्याने प्रयत्नांना यश मिळत नव्हते, मात्र अखेर वाघाची निश्चिती करून वनविभागाने मादी वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळवले.
वनविभाग सध्या नर वाघावर देखरेख ठेवत आहे आणि लवकरच त्यालाही पकडले जाईल अशी अपेक्षा आहे.