सिरोंचा:महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्या योजनांचा समस्त नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्या,असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम अश्या नरसिंहपल्ली येथे आज जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम,अहेरीचे माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,अहेरीचे माजी सरपंच रामेश्वर बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेली, रेगुंठाचे सरपंच सतीश आत्राम,उपसरपंच श्रीनिवास कडार्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार, फाजील पाशा,संजय पेदापल्ली, ओमप्रकाश ताटीकोंडावार,सलाम शेख,सल्लार सय्यद,शंकर बंदेला, रमेश मानेम,समय्या कुळमेथे,कैलास कोरेत,मांतय्या आत्राम,पराग पांढरे, उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावडे, नरसिंहपल्लीचे सरपंच किष्टय्या पोरतेट,उपसरपंच लसमय्या नलगुंटा, राजेश शेट्टीवार,सुमनबाई मडावी, सुष्मिता पाटेम,विना अग्गुवार, मोयाबीनपेठाचे सरपंच बेबीताई कोडापे,उपसरपंच शंकर रत्नम, सत्यना कवटारपू, संतोष जाकेवार,अहेरीचे सुरेंद्र अलोने, स्वामी पोन्नावार,अंजु तोडसाम, बोगटागुडमचे पोलीस पाटील रंगय्या कोडापे,दर्षेवाडाचे पोलीस पाटील वेंकटस्वामी कावरे,पीरमिडाचे पोलीस पाटील लचन्ना चेनुरी,येलाचे पोलीस पाटील पेंटाजी जाकेवार,ग्रा.प.सदस्य चंद्रकांत कोडापे,भीमराव सडमेक बायका आलाम, श्रीनिवास जंगम, शंकर सल्लावार,व्येंकना चुकावार, नारायण कडार्ला,बकय्या तोडसाम, रामकिष्टु नीलम,कोंडया कटकू, गोविंदा पेदी, समय्या शेट्टीवार, राजण्णा अग्गुवार, रमेश तोटावार, पोचण्णा मारशेट्टी समय बेझानी, मुतय्या पाकला, सुरेश सुंकरी,वेंकटेश अग्गुवार,राजेश पट्टेम,निर्मला कुळमेथे, व्यंकटेश पडालवार,हैदर शेख,पापय्या कुमरी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री आत्राम यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर या भागातील विकास कामांना आपण प्रथम प्राधान्य देऊन बरेच गावांचा कायापालट केला.मंत्री म्हणून शपथ घेताच या भागातील शेतकऱ्यांसाठी प्राणहिता नदीवर उपसा सिंचन योजना मंजूर केली.उपसा सिंचन योननेचे काम पूर्ण होताच या भागातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे. एवढेच नव्हे तर रस्ते, नाली बांधकाम आणि किरकोड दुरुस्ती साठी कोट्यवधींची निधी दिली. या भागातील खेड्यापाड्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी अनेक रस्त्यांची कामे केली असून बरेच कामे प्रगतीपथावर आहेत.
अनेक वर्षांपासून विकासापासून दूर असलेल्या या परिसरात रस्ते,वीज, सिंचन यासह आदी विकास कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत.याचे श्रेय घेण्यासाठी बरेच लोकं आपल्याला भाषण देतील,आमिष दाखवतील मात्र विरोधकांच्या भूलथापांना बळी नका.माझ्या राजकीय कारकिर्दीत मी सर्वांना सोबत घेऊन चाललो.मात्र,आता काहीजण माझ्याच विरोधात चालले आहेत.त्यामुळे त्यांना योग्य धडा शिकवा असेही त्यांनी आवाहन केले.
समस्या जाणली अन निवेदनही स्वीकारले
जनसंवाद कार्यक्रम आटोपताच या परिसरातील नागरिकांची चर्चा करत समस्या जाणून घेतली त्यानंतर निवेदन देखील त्यांनी स्वीकारले. एवढेच नव्हे तर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.
दरम्यान परिसरातील विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देखील त्यांच्या हस्ते देण्यात आला.